आटपाडी तालुक्यात नेत्यांना ‘बीआरएस’ ची भूरळ : दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या हातामध्ये दिसू लागली बीआरएस ची माहितीपत्रके
येणाऱ्या विधानसभे पर्यंत अनेक नेते बीआरएस मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : राज्याच्या राजकारणामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, वंचित या राजकीय पक्षांची मुक्तेदारी आहे. अनेक प्रस्तापित नेते याच ठराविक पक्षामधून इतर पक्षामध्ये उड्या मारून राजकारण करत असतात. राज्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, वंचित हे प्रमुख पक्ष सोडले तर इतर पक्षामध्ये जाण्यास कोणीही इच्छुक नसतात.
परंतु आता मात्र राज्याच्या राजकारणामध्ये शेजारील तेलंगणा राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समिती पक्षाने राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपले लक्ष केंद्रित केले असल्याने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, वंचित प्रमुख राजकीय पक्षातील नाराजांनी आपला मोर्चा बीएसआर कडे वळविला असून त्याचे लोन आता आटपाडी सारख्या ग्रामीण भागातही पोहचले असून तालुक्यातील राजकारणातील दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या हातामध्ये बीएसआर पक्षाच्या माहितीपत्रके दिसू लागली आहेत. त्यामुळे या पक्षामध्ये तालुक्यातील अनेक नाराज प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत.
आटपाडी तालुक्यामध्ये प्रामुख्याने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षातील पदाधिकारी तालुक्यातील सत्ताकेंद्रात आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजप ब शिवसेना यांच्याकडे मोठी सत्ताकेंद्रे आहेत. तर त्यांच्याबरोबर राजकीय युती, आघाडी करून काँग्रेस, राष्ट्रवादी, रासप हे सत्तेमध्ये आहेत. आता तालुक्यातील अनेकांच्या हातामध्ये भारत राष्ट्र समिती या पक्षाची माहितीपत्रके दिसू लागली आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आटपाडी तालुक्याच्या राजकीय सत्ताकेंद्रामध्ये बीएसआरचा ही समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.