‘एका वाघाची शिकार एका हरणीने केली’; टांझानियाच्या किली पॉलचा खास मराठमोळा लुकमध्ये भुरळ पाडणारा व्हिडीओ पहा…
वेगवेगळे रील्स व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून ‘एका वाघाची शिकार एका हरणीने केली’ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या गाण्यावरील डान्सचे रिल्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आता या मराठी गाण्याची टांझानियाच्या देखील भूरळ पडली आहे. किली पॉलनं नुकताच या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘एका वाघाची शिकार एका हरणीने केली’ या गाण्यावरील व्हिडीओ किली पॉलनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची बहीण नीमा पॉल देखील दिसत आहे. किली आणि नीमा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किलीनं या व्हिडीओला ‘असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये किली हा फेटा, सदरा अशा लूकमध्ये दिसत आहे तर नीमा ही घागरा आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे.
किली आणि नीमा यांनी ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ देखील काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. बिजली बिजली, टिप टिप बरसा पानी आणि कूसू कूसू या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओ किलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.