Latest Marathi News

BREAKING NEWS

 

विहिरीतील गाळ काढताना सापडली मानवी खोपडी; पोलीस तपास सुरु 

0 571

मुंबई : विहिरीतील गाळ काढताना प्लास्टिकच्या पिशवीत मानवी खोपडी सापडल्याने परिसरात एकच खळबळ आली आहे. याची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर खोपडी पंचनामा करून ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे .

 

पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गास टाकी रोड येथे असलेली विहीर मंगळवारी दुपारी स्वच्छ करण्यासाठी स्थानिक मुले उतरली होती. यावेळी त्यांना पाण्यामध्ये पिशवीत कोंबलेली मानवी खोपडी आढळून आली.

सदर पाणी आजूबाजूचे गावकरी पिण्यासाठी वापरत असून या ठिकाणी रात्री अपरात्री चरस गांजा तसेच मद्यपान करणारे रात्री बसत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. नालासोपारा पोलीस आता सदर मानवी खोपडी पुरुष कि स्त्री जातीची आहे. कोणाची आहे, याचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.