Latest Marathi News

BREAKING NEWS

 

मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने कुटुंबीय संतापले! उचललं थेट टोकाच पाऊल; व्हिडीओ पहा…

0 803

बिहारमधील एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीचे कुटुंबीय तिला तिच्या सासरच्या घरातून बळजबरी बाईकवरून घेऊन जाताना दिसत आहे. तर हे प्रकरण प्रेमविवाहाशी सबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर मुलीच्या सासरच्यां लोकांनी तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुलीच्या घरचे तिने मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे नाराज होते. त्यामुळे त्यांनी अचानक मुलीच्या सासरच्या घरी जाऊन मुलीला बाईकवरुन बळजबरी उचलून आणले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन तरुण मुलीला बाईकवर बळजबरी लटकवून घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावेळी ती मुलगी जोरजोरात ओरडत आणि रडत असल्याचं दिसत आहे.

 

पीडित मुलीच्या सासरच्या लोकांनी ऑनर किलिंग अंतर्गत मुलासह सूनेची हत्या करण्याची भीती व्यक्त करत गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे, फारबिसगंज एसडीपीओ खुशरू सिराज आणि पोलीस कर्मचारी नंदकिशोर नंदन यांनी तातडीने कारवाई करत मुलीला ताब्यात घेतले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.