Latest Marathi News

BREAKING NEWS

 

के. चंद्रशेखर राव यांचा सभांचा धडाका : राज्यातील “या” शहरात होणार विक्रमी सभा

0 329

माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघ पिंजून काढण्याचा चंग भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) बांधला आहे. या संघटनेला मजबूत करण्यासाठी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. आता त्यांनी आपला मोर्चा पुण्याकडे वळविला असून लवकर पुण्यामध्ये त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

याबाबत ‘बीआरएस’च्या किसान पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिक कदम आणि पश्चिजम महाराष्ट्र समन्वयक बी.जे. देशमुख यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कदम म्हणाले, आम्ही महाराष्ट्रात काम सुरू केल्यापासून एका महिन्यात १ लाख ८८ हजार सभासद नोंदणी झाली आहे. आमच्या पक्षाकडे शेतकऱ्यांचा येण्याचा वेग पाहता आम्ही लवकरच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानसभा लोकसभा निवडणुकीत विजयी होऊ.

तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे तेलंगणातील शेतकऱ्यांच्या ९९ टक्के आत्महत्या थांबल्या. या तेलंगणा पॅटर्नची देशाला गरज आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात विविध योजना राबवण्यासाठी बीआरएस सर्व मतदारसंघात काम करत आहे. महाराष्ट्रात लवकरच ‘बीआरएस’चा मुख्यमंत्री असेल. बीआरएस पक्षात सर्व पक्षातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. यात काही माजी आमदारांचाही समावेश आहे. यासह मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीही सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.