माणदेश एक्सप्रेस न्युज : अहमदनगर : सध्या ज्या-ज्या लोकांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिसून येत आहेत, त्यांच्यावर कुठली ना कुठली चौकशी सुरू असणारे असेच चेहरे आहेत आणि तेच दावे करत आहेत, असा चिमटाही आंबेडकर यांनी काढला.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करत टीका केली आहे. “बापात बाप नाही आणि लेकात लेक नाही”, अशी परिस्थिती असल्याचे म्हणत महाविकास आघाडीने सर्वात अगोदर जागा वाटपावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं आंबेडकर म्हणाले आहेत.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नगरमधील शेवगाव शहरात झालेल्या धार्मिक दंगलीच्या अनुषंगाने पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप केला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील नेते प्रा.किसन चव्हाण यांच्यावर ते छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचा पुरावा असतानाही आरोपी केले, याची तक्रार आंबेडकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे करत दंगलीची सीआयडी चौकशीची मागणी केली.