Latest Marathi News

BREAKING NEWS

 

सांगलीतील रिलायन्स ज्वेल्स दरोड्यात एकूण लुटीची माहिती आली समोर : दरोडेखोरांनी वापरलेली मोटार मिरज तालुक्यायातील “या” गावात सापडली

0 2,210

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगलीतील रिलायन्स ज्वेल्स दुकानातून भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून १४ कोटींचे दागिने, हिरे, जवाहिरे अज्ञातांनी लंपास केल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले असून दरोडेखोरांनी वापरलेली मोटार मिरजेपासून १७ किलोमीटर अंतरावरील भोसे यल्लमा मंदिराजवळ सोडून देण्यात आल्याचे आढळून आले. पोलीसांच्या हाती अद्याप काहीही ठोस माहिती मिळालेली नसली तरी टोळीने मंगळवेढ्याच्या दिशेने धूम ठोकल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

 

रविवारी दुपारी सांगली-मिरज रस्त्यालगत असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या अलंकाराच्या दुकानावर अज्ञात दरोडेखोरांनी कर्मचार्‍यांना बांधून लूट केली. रात्री उशिरा लूट कितीची झाली याची माहिती समोर आली असून रोकडसह १४ कोटी ६९ हजार ३०० रूपयांची लूट केली असल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही चित्रिकरणामध्ये काही दरोडेखोरांचे चेहरे स्पष्ट झाले असून टोळीने गुन्ह्यात वापरलेली मोटार (एमएच ०४ ईटी ८८९४) सोलापूर मार्गावरील भोसे गावच्या हद्दीत यल्लंमा मंदिरामागे एका शेतात बेवारस स्थितीत सोडण्यात आली असल्याचे सोमवारी सकाळी दिसून आले. मात्र, मोटारीचा नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे चौकशीत दिसून आले. या मोटारीमध्ये एक गावठी पिस्तुल, कपडे पोलीसांच्या हाती लागले असून चोरट्याचा माग घेण्यासाठी सात पथके तैनात करण्यात आली आहेत.

चोरटे मंगळवेढ्याच्या दिशेने गेले असावेत असा कयास असून त्या दिशेने तपास सुरू आहे. पोलीसांच्या हाती अद्याप काहीही ठोस हाती लागलेले नाही, मात्र, दरोडेखोरांनी रेकी करून हा प्रकार केला असल्याचे कर्मचार्‍यांच्या जबाबातून पुढे आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.