Latest Marathi News

BREAKING NEWS

 

लाथा-बुक्क्याने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

0 457

मुंबईः धारावी येथे मारहाणीत ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून याप्रकरणी एका आरोपीला अटक केली.

 

संजय जाधव (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो राजीव गांधी नगर येथील ट्रान्झिट कॅम्प येथील रहिवासी होता. २९ मे रोजी दारूच्या नशेत घराच्या बाजूला काम सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी गेला होता.

त्यावेळी आरोपींनी जाधव याला तेथून जाण्यास सांगितले. पण दारूच्या नशेत असल्यामुळे आरोपी व जाधव यांच्यात वाद झाला. त्यातून आरोपीने लाथा-बुक्क्याने केलेल्या मारहाणीत जाधव खाली कोसळला. त्याप्रकरणी जाधवचा मृत्यू झाल्यानंतर अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.