प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिले जातात बरेचदा, प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही वेळा शिकारीचे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिकारीच्या थराराच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते.
कोण कधी कोणावर हल्ला करेल आणि जीव वाचवण्यासाठी कोण शरणागती पत्करेल हे कोणीही सांगू शकत नाही. प्रत्येक व्हिडीओमध्ये काहीतरी वेगळं पहायला मिळतं. सध्या असाच एक म्हशींचा आणि सिंहिणीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होतोय.
आपल्याला माहितीच आहे, दोन बायकांमध्ये भांडणं झाली की, त्या कोणाचंच ऐकत नाहीत. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येही म्हस आणि सिंहिणीमध्ये जोरदार भांडण झालं आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, म्हशींचा कळप रस्त्याच्या कडेला उभा आहे.
तेवढ्यात तिकडे एक सिंहिण येते आणि म्हशींवर हल्ला करते, मात्र म्हशीही मागे हटत नाही त्यासुद्धा सिंहीणीवर प्रतीहल्ला करतात. एक म्हस भांडणात जखमी होते, तेवढ्यात दुसरी म्हस सिंहिणीला शिंगावर उचलून घेते. ती दोनदा सिंहिणीला शिंगावर उचलून जोरात आपटते.
https://twitter.com/Figensport/status/1664611571396661248?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1664611571396661248%7Ctwgr%5E31a09066d3cee9208f26f36bfbeb178059bc176c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fbuffalo-hit-the-lioness-on-its-horn-thrilling-video-in-the-forest-goes-viral-on-social-media-srk-21-3699929%2F