आटपाडी: शिक्षणाला वय लागत नाही म्हणतात ते खर आहे! महिलेने वयाच्या ३२ व्या वर्षी दिली दहावीची परीक्षा
मुढेवाडी: आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी गावातील सौ. कल्पना दामोदर मुढे यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी दहावीची परीक्षा देऊन त्या 59 .60% गुण मिळवून यशस्वी झाल्या आहेत.
आजच्या काळात शिक्षण किती महत्वाचे आहे समजले जाते. कारण आताची जास्तीत जास्त तरुण पिढी ही शिक्षणाच्या वाटेने चाललेली दिसून येत आहे कारण आताच्या पिढीने शिक्षण घेण तितकाच महत्वाचे समजले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ‘शिक्षण हे वाघीणीच दुध आहे जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ त्यामुळे शिक्षण घेण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि त्यामुळे शिकले पाहिजे.
सौ. कल्पना दामोदर मुढे यांनी ही मनामध्ये शिकण्याचा निश्चय करून वयाच्या 32 व्या वर्षी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. कल्पना मुढे यांचे शिक्षण २००५ पासून थांबले होते. परंतु त्यांनी १७ वर्षानंतर त्यांनी दहावीची परीक्षा द्यायचा निर्णय घेतला.
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा भक्कम पणे पाया उभारला. त्यांनी मुलींना चूल आणि मुल यातून बाहेर पडून शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले. त्याच सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन कल्पना मुढे यांनी पुन्हा अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या दहावीच्या परीक्षेमध्ये 59.60% मिळवून यशस्वी सुद्धा झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.