आटपाडी : घरचे आर्थिक परिस्थती नसल्याने शिकवण्यास तयार नव्हते! काका आणि शिक्षकांनी केला सपोर्ट; मुढेवाडीच्या विद्यार्थिनीने मिळवले दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
आटपाडी: आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी या गावातील कन्या कु. गौरी संजय मुढे ही जीवनदीप विद्यामंदिर कामथ या शाळेमध्ये शिकत होती.
घरची परिस्थती आर्थिक असल्याने घरच्यांनी शिकवण्यास नकार दिला . त्यामुळे तिचे दोन वर्ष शिक्षण थांबले. परंतु मनामध्ये शिकण्याची जिद्द असल्याने तिने पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. परंतु आर्थिक परिस्थिती असल्याने तिला शिक्षणासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून तिला शिकवण्यासाठी गौरी मुढे हिचे चुलते सतीश मुढे आणि त्यांची पत्नी सीमा सतीश मुढे आणि जीवनदीप विद्यामंदिर कामथ च्या सर्व शिक्षकांनी तिला आर्थिक अडचणीत मदत देखील केली. या सर्वांचा पाठींबा असल्याने आणि तीच्या शिकण्याच्या जिद्दीतून आज ती या यशापर्यंत पोहचली.
दररोज सकाळी घरातील सगळी काम करून गौरी ही शाळेत जात असे, तसेच आल्यावर सुद्धा तिला सगळी काम करून ती अभ्यासाला वेळ देत असे. तिच्या या संघर्षमय प्रवासातून तिने दहावी मध्ये 79.60% गुण मिळवून जीवनदीप विद्यामंदिर कामथ या शाळेतून दुसऱ्या क्रमाकांनी यशस्वी झाली आहे.
त्याचबरोबर ती चांगल्या गुणांनी उतीर्ण झाल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व तिला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा….!