Latest Marathi News

BREAKING NEWS

 

संघर्ष! ९५ वर्षीय आजोबा पोट भरण्यासाठी करत आहेत हे काम; बघून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल; व्हिडीओ पहा…

0 1,037

सोशल माध्यमांवर दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

 

 

रस्त्यावर एखादा तरुण माणूस भीक मागायला आला तर आपण त्याला म्हणतो की ’हट्टकट्टा तर आहेस, भीक का मागतोस? काम का नाही करत.’ आपला हा फुकटचा सल्ला ऐकून तो एकतर तोंड पाडतो किंवा आपल्यालाच गुर्मी दाखवतो. मात्र एक आजोबा वयाच्या ९५ व्या वर्षीही कष्ट करताना पाहायला मिळाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजोबा एका लग्न समारंभात ढोल वाजवताना दिसत आहेत. त्यांचे वय ९५ वर्षे आहे. या वयातही आजोबा पोटापाण्यासाठी कष्ट करून पैसे कमावतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते कधी सर्वांसमोर ढोल वाजवतात तर कधी थकून जमिनीवर बसतात. आपण आजूबाजूला धडधाकट लोक भीक मागताना पाहतो, तरुण मुलं नशेच्या आहारी गेलेली पाहतो. मात्र हे आजोबा अगदी आयुष्याच्या शेवटच्या काळातही स्वत:हा कमवून खात आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोटिवेशन मिळालं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.