Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आश्चर्यचकित! चक्क तिसऱ्या दिवशी बाळ लागले रांगायला; व्हिडीओ पहा…

0 712

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही थक्क करणारे. शिवाय काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपणाला आपल्याच डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केवळ तीन दिवसांची नवजात नायलाला हॉस्पिटलच्या कॉटवर रांगताना दिसत आहे. या मुलीला रांगाताना पाहून तिच्या आईलाच धक्का बसला आहे.

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलीच्या आईचे नाव सामंथा मिशेल असं आहे. सामंथा यांनी जेव्हा आपल्या तीन दिवसांच्या मुलीने शरीराला आधार देण्यासाठी आपले हात बाहेर काढल्याचं आणि डोके वर उचलल्यांच पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. व्हाईट ओक, पेनसिल्व्हेनिया, यूएस येथे राहणाऱ्या सामंथा यांनी आपल्या मुलीचा रांगताना इकडे तिकडे बघतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या घटनेनंतर सामंथा यांनी सांगितले की, मी पहिल्यांदा रांगताना पाहिले तेव्हा मला धक्का बसला. ती पुढे म्हणाली, “नायला ज्या प्रकारे डोके वर काढून रांगायला लागली, ते पाहून मला पूर्ण धक्का बसला. जेव्हा हे घडले तेव्हा खोलीत मी आणि माझी आई दोघीच होतो. यावेळी आईने मला मुलीचा व्हिडीओ शूट करण्यास सांगितले. शिवाय हा व्हिडीओ शूट केला नसता तर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता.

 

शिवाय नायलाने रांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती पूर्ण तीन दिवसांचीही झाली नव्हती, तीला फक्त अडीच दिवस पुर्ण झाले होते. महत्वाची बाब म्हणजे, नायलाचा जन्म २७ फेब्रुवारी २०२३ रोजी तीन आठवडे उशिरा झाला होता. लहान मुले सहसा वयाच्या नऊ महिन्यांपासून पुढे रांगायला सुरूवात करतात, मात्र नायला तीन दिवसांची असतानाच रांगायला लागल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.