उत्तर प्रदेशातील बांदा येथील एका अल्पवयीन मुलाविरुद्ध २००८ मध्ये एका महिलेने तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये तिने एका मुलाने तिच्या अल्पवयीन मुलीला अश्लील पत्र लिहून तिचा विनयभंग केल्याचं तक्रारीत लिहले होते. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.
दरम्यान, मागील १५ वर्षांत या खटल्याच्या अनेक तारखा पडल्या. अनेक न्यायाधीश बदलले आणि तब्बल १५ वर्षानंतर घटनेतील तरुणाला दोषी ठवरवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण कोतवाली शहरातील एका गावातील आहे. येथील एका महिलेने २००८ मध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गावातील अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या महिलेने आपल्या तक्रारीमध्ये लिहिलं होतं की, तिची १४ वर्षांची मुलगी शाळेत जाताना एका तरुणाने तिचा विनयभंग करत अश्लील कृत्य केली.
२१ मे २००८ रोजी एका अल्पवयीन मुलाने एका लहान मुलाच्या हातून तिच्या मुलीला अश्लील पत्र पाठवले, शिवाय या पत्रात तुम्ही या प्रकरणाची पोलिसात तक्रार केल्यास मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ठार मारेन, असेही लिहिलं होतं. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले.