माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सोलापूर येथील अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून सहा घरफोड्या उघडकीस आल्या अहित. पोलिसानी त्याच्याकडून २ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बाबु काजाप्पा मुंगली (वय 27, रा. मजेरवाडी, सोलापूर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली लो रोती, , चौरट्याच्या शोधासाठी पोलिसांनी गस्त वाढवली होती. तुसेच विश्रामबाग परिसरात कोम्बिंग करण्यात आले होते. विश्रामबाग पोलिसांनी त्रिमुती कॉलनी परिसरात एकजण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्या सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, हातोडा आढळला. चोकशीत त्याने सहा घरफोड्यांची या ली दिली. बांबु मुंगली याच्यावर पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असून तों सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने तसेच मोटरसायक, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात येणारे साहित्य असा २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विश्रामबागचे पोलिस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, संदिप घस्ते, आदिनाथ माने, महंमद मुलाणी, विलास मुंढे, दरीबा बंडगर यांच्या पथकाने कारवाई कली.