माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : मिरजेतील दर्गा रोड परिसरात मंगल टॉकीजजवळ नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून नायटोसन गोळ्यांची 8 पाकिटे जप्त करण्यात आली असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
गौस हुसेन बागवान उर्फ गौस शेख (वय 25, रा. नदाफ़ गल्ली, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि.10 मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतलेल्या बेठकीत नशील्या गोळ्या, पदार्थ करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी एलसीबीला विशेष पथक स्थापन करून यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी एक पथक तयार केले होते.

हे पथक मिरजेत गस्त घालत असताना दर्गा रोडवरील मंगल टॉकीजजवळ एकजण नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माता चवाचाह मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून गौस शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती तर त्याच्याजवळ नायट्रोसन गोळ्या सापडल्या. गोळयाबाबत अधिक चौकशी केल्यानंतर त्याने ह्या गोळ्या सांगलीतील कर्नाळ रस्ता परिसरातील जॅग्वार उर्फ शाहबाज शेख यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली.
परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संदेश डक , मनीषा कदम, निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ह च यक निरीक्षक संदीप शिंदे, संजय कांबळे, तीचे मच्छिन्द्र बर्डे, संकेत मगदूम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.