Latest Marathi News

BREAKING NEWS

विटा ‘बोकड बळी’ प्रकरण : मांत्रिकासह तिघावर गुन्हे दाखल

0 737

माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : विटा ‘रस्त्यावर बोकड बळी’ प्रकरणी संशयित संजय जरग त्याचा साथीदार आणि संबंधित मांत्रिक (तिघेही रा. विटा, जि. सांगली) अशा तिघांवर विटा पोलिसांत आज (दि. २३) गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे यांच्या फिर्यादीवरून अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अपघातातून लवकर बरे व्हावे, म्हणून बोकडाचे मुंडके आणि दोन पाय शिवाय नारळ, रोट्या, काजळ, पावडर, लिंबू, दारूची बाटली आदी साहित्य विटा- कराड महामार्गावर टाकले होते. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना विट्यात घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.

Manganga

 

दिनांक १६ मेरोजी रात्री ९ च्या सुमारास राजेंद्र सोमू राठोड यांच्या मालकीच्या जमीन गट नं. २२७ मधील हॉटेल शिवार शेजारील मोकळ्या प्लॉटमध्ये एक बोकड कापून तेथे मुंडके व दोन पाय ठेवले होते. त्याच्या शेजारी एका कागदावर नारळ, दामटा, तांदूळ, देशी दारूची बाटली, काजळ, लिपस्टीकची डब्बी, गांजा, दवाखान्याची चिठठी, लिंबू, हळद व कुंकू ठेवून तेथे पूजा केल्याचे दिसत होते.

 

जागा मालक राजू राठोड यांनी संजय जरग यांच्याशी संपर्क केला. यावेळी संजय जरग याने याठिकाणी माझा चार वर्षापूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी मला एका मांत्रिकाने अपघात झालेल्या ठिकाणी बोकडाचा बळी देवून उतारा द्या, असे सांगितले. त्यामुळे आपण रस्त्यावर बोकडाचा बळी दिला असल्याचे सांगितले.

 

तसेच तुम्ही पोलिसांत तक्रार केली, तर हात- पाय मोडून टाकेन, जिवंत सोडणार नाही, अशी दमदाटीही जरग याने केली होती. या फिर्यादीवरून संजय जरग, त्याचा साथीदार आणि संबंधित मांत्रिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!