माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा पदभार संतोष पुजारी तर उपसभापतीपदाचा पदभार राहुल गायकवाड यांनी स्विकारला.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना, काँग्रेस, रासप आघाडीला नऊ जगावर विजय मिळविला होता. तर भाजप राष्ट्रवादी युतीला नऊ जागा मिळाल्या होत्या. दोन्ही गटाला समान जागा मिळाल्याने सभापती व उपसभापती निवडणूकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.

यामध्ये शिवसेना, काँग्रेस, रासप आघाडीने भाजप, राष्ट्रवादीचे एक मत मिळवत सभापती व उपसभापती पदाचे दोन्ही उमेदवार विजयी केले होते. यामध्ये शिवसेना गटाकडून सभापतीपदी संतोष पुजारी व काँग्रेसचे राहुल गायकवाड विजयी झाले.
काल जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, काँग्रेसचे जयदीप भोसले यांच्या उपस्थित सभापतीपदाचा संतोष पुजारी तर उपसभापतीपदाचा पदभार राहुल गायकवाड यांनी स्विकारला. यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी बाजार समितीच्या कार्यालयात भेट देत संतोष पुजारी व राहुल गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.