Latest Marathi News

BREAKING NEWS

मांत्रिकाच्या अमानुष मारहाणीत शाळकरी मुलाचा मृत्यू

0 724

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळीयेथील आर्यन दीपक लांडगे (वय १४ वर्षे) या शाळकरी मुलाचा कर्नाटकातील मांत्रिकाच्या मारहाणीत मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या आर्यनवर मिरजेत शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र शनिवारी (दि. २०) त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कवठेमहांकाळ पोलिसांकडे केली.

अंनिसचे कार्यकर्ते फारुक गवंडी, सचिन करगणे, दिगंबर कांबळे, भगवान सोनंद यांनी आर्यनच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांना आधार दिला. मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यासाठी राजी केले. नातेवाईकांनी सांगितले की, आर्यनला बऱ्याच दिवसांपासून ताप येत होता. तो बरा व्हावा यासाठी एका नातेवाईक महिलेच्या सल्ल्याने तिला कर्नाटकात मांत्रिकाकडे नेण्यात आली. आर्यनला बाहेरची बाधा झाल्याचे मांत्रिकाने सांगितले. अंगात शिरलेले कथित भूत बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने आर्यनला अमानुष मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत त्याला मिरजेत शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

Manganga

मांत्रिकावर कठोर कारवाईसाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची भेट घेतली. निवेदन दिले. त्यानुसार पोलिसांनी आर्यनच्या आईची फिर्याद नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु केली. हा गुन्हा कुडची पोलिस ठाण्याकडे वर्ग करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी भोंदू मांत्रिकांपासून सावध रहावे असे आवाहन अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!