Latest Marathi News

BREAKING NEWS

धक्कादायक! बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्याची इच्छा होती म्हणून पत्नीनेच केली पतीची हत्या

0 766

राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील बाखासर पोलीस स्टेशन हद्दीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह माउंट अबू येथे सापडला आहे. मृतदेह सापडल्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी या खळबळजनक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पत्नीने प्रियकर आणि त्याच्या साथीदारासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला होता. आधी पतीचे अपहरण केले आणि नंतर गळा आवळून हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तो 250 किलोमीटर अंतरावरील माउंट अबू येथे फेकून देण्यात आला.

मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलीस, वनविभागाने तीन दिवस शोधमोहीम राबवली. तीन दिवसांनंतर तरुणाचा मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. मृताच्या पत्नीला प्रियकराशी लग्न करायचं होतं, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

Manganga

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाखासर भागातील हेमावास येथील रहिवासी गोकलाराम हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या भावाने 12 मे रोजी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तपास अधिकाऱ्याने सांगितले की, मृत तरुणाच्या पत्नीला आपल्या प्रियकराशी लग्न करायचे होतं. आपल्या पतीला लग्नाच्या मार्गापासून दूर ठेवण्यासाठी तिने कट रचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकलाराम याचे तीन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये लग्न झाले होते. त्याला मूलबाळ नाही. मृताची पत्नी मांगी देवी हिचे प्रियकर पन्ना राम याच्याशी संबंध होते. मांगी देवीने पतीला मार्गातून दूर करण्याचा कट रचला. पन्ना राम 8 मे रोजी आपल्या गावी आला होता. पत्नीने सकाळी 7 वाजता आपल्या प्रियकराला मोबाईलवर मेसेज केला की गोकलाराम आज सकाळी 9 वाजता निघणार आहे. त्यानंतर प्रियकराने त्याचा पाठलाग केला. रस्त्यात पन्ना रामने गोकलारामला उसाच्या रसात झोपेच्या गोळ्या दिल्या. पालनपूरला नेलं आणि तिथे मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह फेकून दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!