लोकलमध्ये तुफान गर्दी असतानाही आईने बाळ सुखरूप राहावे म्हणून ठेवले अश्या ठिकाणी; पाहून तुम्हीही कौतुक कराल! व्हिडीओ पहा…
दिवसाच्या अगदी कोणत्याही वेळेस मुंबई लोकल रिकामी दिसणे म्हणजे अत्यंत दुर्मिळ दृश्य आहे आणि अशात संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या व सकाळी कमला जाण्याच्या वेळी तर शहाण्या माणसाने भलते प्रयोग करूही नये. अशा गर्दीत लहान बाळ आणि मोठी बॅग घेऊन चढू नये हा अलिखित नियमच आहे असे म्हणता येईल. पण काही वेळा प्रवाशांचा नाईलाज असतो.
आणि ते गर्दीच्या वेळी दोन्हीपैकी एक किंवा काहीवेळा दोन्ही निषिद्ध गोष्टींसह ट्रेन पकडतात. अशीच स्थिती या व्हायरल होणाऱ्या आईची आहे. मुंबई लोकलमध्ये एक महिला अलीकडे आपल्या चिमुकल्याला घेऊन भरगर्दीत चढली होती. ट्रेन इतकी पॅक होती की इथे बसायला सोडसा उभं राहायलाही धड जागा नव्हती. अशावेळी बाळाच्या सोयीसाठी या आईने जे काही डोकं लावलंय ते बघून बाकीच्या महिला सुद्धा पार थक्क झाल्या होत्या.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की लोकलमध्ये सीट्सच्या वर बॅग्स व अन्य सामान ठेवायला रॅक असतात. या लोखंडी रॅक खाली नीट उभं राहता यावं म्हणून उंची थोडी जास्त ठेवलेली असते. इथे अनेकदा बॅग कोंबून ठेवलेले तुम्हीही पाहिले असेल. व्हिडिओमध्ये या महिलेने आपली अवघ्या वर्षाच्या वाटणाऱ्या बाळाला चक्क या रॅकवर बसवले आहे.
अर्थात आईचं काळीज म्हणून ती स्वतः घाबरलेली दिसतेय पण खाली सुरु असलेल्या चेंगराचेंगरीपेक्षा हे बाळ त्यातल्या त्यात सुरक्षित दिसतेय. खाली उभ्या असलेल्या अन्य महिला सुद्धा आश्चर्याने या बाळाकडे बघत आहेत. सुदैवाने बाळ रडत नसल्याने आईच्या या भन्नाट आयडियाचे सगळ्यांना कौतुक वाटत आहे.