Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगोला: डोंगर पाचेगावच्या वर्गमित्रांचा २७ वर्षांनी भरला स्नेहमेळावा..

0 814

सांगोला: तालुक्यातील डोंगर पाचेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल पाचेगाव बुद्रुक येथील १९९३ च्या सातवी व १९९६ इयत्ता दहावीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनीचा २७ वर्षांनंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र भेटले एकमेकांशी संवाद साधत त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. सर्वजण जुन्या आठवणींनी भारावून गेले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होता. डोंगर पाचेगावच्या वर्गमित्रांचा २७ वर्षांनी भरला स्नेहमेळावा भिवघाटच्या बी आर मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न झाला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेगाव बुद्रुक न्यू इंग्लिश स्कूल पाचेगाव बुद्रुक च्या १९९३-९६ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी त्या बॅचचे वर्गशिक्षक एल. एन. शिंदे सर होते. प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य सूर्यकांत घोडके सर तात्यासो काबुगडे गुरुजी बी आर. बिले, जयनंदा कोळेकर मॅडम, घोडके मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली.

Manganga

यावेळी बोलताना एल एन शिंदे सर म्हणाले बऱ्याच वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांना भेटून आनंद झाला आज माजी विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत असल्याने मला त्यांचा अभिमान आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना तात्या काबुगडे गुरुजी म्हणाले तब्बल २७ वर्षानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आल्याने मनस्वी आनंद झाला आहे जुन्या माजी विद्यार्थ्यांची संवाद साधल्यामुळे जुन्या आठवणीला उजाळा मिळाला अद्यापही निम्मे आयुष्य तुमच्या हातात असून त्याचा आनंद घ्या, असे आवाहन करत सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक वाटते असे त्यांनी सांगितले.

डोंगर पाचेगावच्या गावातील पहिलाच विद्यार्थ्यांचा २७ वर्षांनंतर झालेला भेटीचा क्षण हा आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.या स्नेह मेळाव्यात सर्वांनी एकत्र जेवण केले प्रत्येकाने आपापली ओळख करून आपल्या नोकरी, उद्योग, व्यवसायाची माहिती दिली.

शाळेत असताना आलेले अनुभव, केलेल्या खोड्या, वेगवेगळ्या करामती, गमतीजमती, शिक्षकांचा खाल्लेला मार या सर्व घटनांना नव्याने उजाळा देऊन मेळाव्याचे वातावरण आनंदी केले. झालेल्या असणे स्नेह मेळाव्यात जवळपास ४५ माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता.ह्या स्नेह मेळाव्यासाठी डोंगर पाचेगाव येथील १९९३ व १९९६ च्या सातवी व दहावी बॅच च्या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार धनाजी सरगर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!