आटपाडी: श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी येथे, काल दिनांक, 20 मे रोजी B.com-3 या वर्गाचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम घेण्यात आला होता.
त्याचबरोबर या, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय लोंढे सर उपस्थित होते. याशिवाय महाविद्यालयातील डॉ.ऋतुजा कुलकर्णी, डॉ. किशोर जाधव, डॉ. हणमंत सावंत, डॉ.सदाशिव मोरे, प्रसाद माळी, गायकवाड सर, मंगल मारकड, व इतर कर्मचारी ही उपस्थित होते.

वाणिज्य विभागातील B.com- 3 या, वर्गाच्या सदिच्छा समारंभामध्ये B.com-3 चे विध्यार्थी, कु. रेश्मा राजगे, कु. आरती पाठक, कु. विक्रम ढोले, व रवींद्र दोडपिसे या विध्यार्थानी आपले मनोगत व्यक्त केले.
त्याचबरोबर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाविद्यालयातील प्राचार्य, डॉ. विजय लोंढे सर, व डॉ.ऋतुजा कुलकर्णी, डॉ. किशोर जाधव, डॉ. हणमंत सावंत, डॉ. सदाशिव मोरे, प्रसाद माळी, या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन हा सदिच्छा समारंभ हा कार्यक्रम संपन्न झाला.