वाघ हा जंगलातील भयानक प्राण्यांपैकी एक आहे. वाघाला भयंकर शिकारी म्हणून ओळखलं जातं. तो आपल्या शिकारीला क्वचितच सोडत असेल. त्यामुळे जंगलातील इतर प्राणीही त्याला घाबरतात. या मांसाहारी प्राण्यांना जंगलातील प्राण्यांना मारून पोट भरण्याशिवाय जगण्याचे दुसरे साधन नाही.
अशात परिस्थितीत ते पोट भरण्यासाठी कशाचीही शिकार करताना दिसून येतात. विशेषतः हरण तर अतिशय कोमल प्राण्यांच्या श्रेणीत येतं आणि जंगलात सर्वाधिक शिकार याच प्राण्याची होते. सध्या वाघाच्या शिकारीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

जंगलाच्या मध्यभागी हरणांचा कळप पाहून भयंकर वाघ शिकार करण्याचा निर्णय घेतो. आधी तो सगळं पाहतो, मग संधी मिळताच तो त्यांच्यावर झडप घालतो. पण तो हरणाला पकडण्याआधीच हरीण इकडे तिकडे पळू लागतं आणि नदीत उडी मारते .
वाघाने हरणाच्या मागे नदीत उडी मारली. पण हरणाने अशा प्रकारे डुबकी मारली की वाघ त्याचा शोध घेत राहिलं आणि शेवटी त्याला रिकाम्या हाती परतावं लागलं. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.
Ohh dear deer…
Tigers of Sunderbans mangroves are adopted to catch the prey even in water. But here is one that dodged the big cat.
VC:@Plchakraborty pic.twitter.com/5dU8Ih1hDl— Susanta Nanda (@susantananda3) May 18, 2023