सोशल मीडियावर पोस्ट केले जाणारे काही व्हिडीओ हे विनोदी स्वरुपाचे असतात. तर काही व्हिडीओ पाहिल्यावर आपण भावूक होतो. तसेच काही व्हिडीओ पाहताना काळजाचा ठोका चुकतो की काय अशी भावनाही मनात येत असते. सोशल मीडियावर अनेक चित्तथरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. व्हिडीओमधले स्टंट्स पाहून आपल्याला घरबसल्या घाम फुटत असतो. अशाच एका व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण गगनचुंबी इमारतीवर स्टंट करत असल्याचे पाहायला मिळते. सुरुवातीला हा तरुण एका इमारतीच्या गच्चीवरुन धावताना दिसतो. त्यांच्यामागे एकजण हातांमध्ये कॅमेरा घेत धावत त्याला शूट करत आहे असेही दिसते. स्टंट करणारा तो तरुण धावत गच्चीवरुन उडी मारतो आणि समोरच्या इमारतीच्या गच्चीपर्यंत पोहोचतो. उडी मारल्यानंतर काही सेकंदांसाठी तो तरुण दोन इमारतींच्यामध्ये असतो. तेव्हा तो हवेमधून खाली पडू शकतो असेही वाटते. पण धावल्यामुळे तो दुसऱ्या इमारतीच्या गच्चीवर सुरक्षितपणे पोहोचतो.

आता पुन्हा हा व्हिडीओ चर्चेत आहे. ४.५ लाख यूजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे. १६,५०० पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये लोक सतत कमेंट करत आहेत. हा जीवघेणा स्टंट करायची काय गरज आहे अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकरी देत आहेत. तर दुसऱ्या यूजरने अशा व्हिडीओवर बंदी आणायला हवी अशी कमेंट केली आहे. काही लोकांनी हे स्टंट करु नये असे सर्वांना आवाहन केले आहे.