माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगलीवाडीत एका अट्टल दुचाकी चोरट्यास अटक करण्यात आली. चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सांगलीतील तीन तर मिरजेतील एक असे चार गुन्हे उघडकीस आणण्यात सांगली शहर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.
सौरभ राजेंद्र इंगळे (वय २२, रा. मेंढे मळा, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दुचाकी चोरट्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरचे निरीक्षक देशमुख पी प्रकटीकरण शाखेला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, शुक्रवारी मध्यरात्री येथील कदमवाडी रस्त्यावर एक तरूण दुचाकी घेऊन संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने “आपळा रकत इंगळे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडील दुचाकीबाबत चोकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेऊन कसून चोकंशी केल्यानंतर त्याने सांगली आणि मिरजेतून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सव्वा लाख रूपयांच्या चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, विनायक शिंदे, झाकीर काझी, अभिजित माळकंर, आरिफ मुजावर, सचिन शिंदे, संदीप , अमित मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.