Latest Marathi News

BREAKING NEWS

20 हजारांची लाच स्वीकारताना तहसीलदार ताब्यात

0 758

माणदेश एक्सप्रेस न्युज : कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव  येथील तहसीलदारास 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील ही घटना असल्याने खळबळ उडाली आहे.

 

यातील तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून वाळू वाहतुकीच्या गाडीवर कारवाई न करण्याकरता लाच घेणाऱ्या कोपरगावच्या तहसीलदारासह पंटरला शनिवारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Manganga

 

तक्रारदारावर कोणतीही केस न करता पकडलेला वाळूचा डंपर सोडून देण्यासाठी कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी 20 हजारांची लाच मागितली. तसेच लाचेची रक्कम पंटरकडे देण्यास सांगितले. दरम्यान एसीबीने सापळा रचून खासगी इसम गुरमितसिंग दडियल याला 20 हजारांची लाच स्वीकारताना पंच साक्षीदारा समक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!