Latest Marathi News

BREAKING NEWS

बचतगट-फायनान्सकडून वसुलीसाठी धमकी आल्याने महिलेची आत्महत्या

0 729

माणदेश एक्सप्रेस न्युज : बीड :  बचतगट-फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी धमक्यांना कंटाळून महिलेने आत्महत्या  केली आहे. फैमिदा अलीम शेख (वय 39, रा. क्रांतिनगर, अंबाजोगाई)  असे मयत महिलेचे नाव आहे.  विषारी औषध प्राशन करुन तीने आत्महत्या केली.  ही घटना शनिवारी घडली आहे. त्यामुळे याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यासह सात जणांवर अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फैमिदा यांची मुलगी सुमेरा अफरोज शेख हिच्या फिर्यादीनुसार, फैमिदा यांनी घरगुती कामांसाठी विविध बचत गट आणि फायनान्स कंपनीकडून कर्ज काढले होते. या कर्ज रकमेच्या वसुलीसाठी बचत गटाच्या रेश्मा शेख, सलमा युसुफ पठाण, शमीम खतीब (तिन्ही रा. क्रांतिनगर, अंबाजोगाई), नसरीन जिलानी शेख, जकीय महबूब महबूब (दोन्ही रा. आकाशनगर), हीना शेख (रा. लालनगर) आणि सूर्योदय फायनान्सचे कर्मचारी यांनी फैमिदा यांच्याकडे सतत तगादा लावला. त्यासाठी त्यांना धमक्या देण्यात आल्या आणि घरातील सिलेंडरही उचलून नेले. अखेर सततच्या तगाद्याला त्रासलेल्या फैमिदा यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.

Manganga

 

फैमिदा यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे उपचार सुरु असताना फैमिदा यांचे निधन झाले. त्यामुळे मुलगी सुमेराच्या फिर्यादीवरुन सात जणांविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तर या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!