माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीच्या उपसभापती पदी निवड झालेबद्दल राहुल गायकवाड यांचा सत्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांनी श्रीफळ, शाल, फेटा बांधून करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
शेटफळेकरांचा स्वाभीमानी बाणा, आजोबा गणपतरावआबा गायकवाड यांच्या कडील , जिगरबाज वृत्ती आणि सतत कार्यरत राहण्याचा राहुलचा स्वभाव, राहुलला निश्चितच तालुका स्तरावर नावारूपास आणल्याशिवाय राहणार नाही . अशा शुभेच्छा पर आशिर्वाद रावसाहेबकाका पाटील यांनी यावेळी दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष सुरज पाटील, शेतीनिष्ट युवा नेते संभाजीराव पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुका सरचिटणीस नितीन डांगे, शेटफळेचे सामाजीक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड, सुहास खंदारे इत्यादी उपस्थित होते.