माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याच दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर २ हजार रुपयांच्या नोटेला हार घालत श्रध्दांजली वाहण्यात आली. तर या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक १० लाख रुपये किंमतीच्या २ हजार रुपयांच्या नोटा फुटपाथवर ठेवून निषेध नोंदविला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयानंतर काळा पैसा बाहेर येईल. त्यावेळी भाजप नेत्यांकडून सांगण्यात आल. मात्र त्या निर्णयामधून काहीच साध्य झालं नाही. उलट बँकेच्या रांगेत थांबून अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहे. त्या सर्व बळीना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार होते. त्याबाबत नरेंद्र मोदी यांनी कधीच भूमिका मांडली नाही.
