शिवपुरी जिल्ह्यातील करेरा ब्लॉकमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक महिला शिक्षिका CCLE प्रशिक्षण कार्यक्रमात पुरुष सहकाऱ्यासह बॉलीवूड बीट्सवर नाचताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील असल्याचे समजतेय. इथे सरकारी हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना CCLE तर्फे प्रशिक्षण दिले जात होते.

या CCLE प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांना सतत आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे हा होता. तसेच, वर्गातील मनोरंजक आणि आनंददायक वातावरणात त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी एक खेळीमेळीचे वातावरण तयार केले जात होते.
हे सत्र सुरु असताना या शिक्षिकेने ‘आपके आ जाने से’ या बॉलीवूड गाण्यावर कमाल मूव्ह्ज दाखवल्या. नंतर, अजून एक शिक्षक देखील तिथे मॅडमच्या स्टेप्सच्या तोडीस तोड नाचू लागले आणि कर्मचारी सदस्यांनी सुद्धा शिट्ट्या वाजवून त्या दोघांचे कौतुक केले.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून यावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी या खेळकर शिक्षकांचे कौतुक केले आहे. शाळा म्हणजे शिक्षा नाही हसत खेळात, गाऊन- नाचून विद्यार्थ्यांना शिकवल्यास त्यांना समजण्यास मदत होऊ शकते. असेही काहीजण म्हणत आहेत.
#ViralVideo from Shivpuri: A female #teacher grooves to #Bollywood beats with a male teacher during the training programme amid whistles by other staff members#MPNews #MadhyaPradesh pic.twitter.com/HrMgh5L8eE
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) May 18, 2023