सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका अॅपल स्टोअरमधून चोरी करणे एका चोरट्याला चांगलंच महागात पडले. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

व्हिडीओत दिसते की एक चोरटा अॅपल स्टोअरमधून चोरी करुन पळताना दिसत आहे. स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात तो चक्क दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारतो आणि खाली पडतो. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, या चोरट्याला पळणे तर सोडा नीट उभंही राहता येत नाही.
कारण त्याला इतकी दुखापत होते की त्याला पळता येत नाही आणि आणि चोर तावडीत सापडतो.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून नेटकरी यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
Dude jumps off 2nd floor trying to get away after robbing Apple store 😬 pic.twitter.com/pdEjodh1Ka
— Crazy Clips (@crazyclipsonly) May 17, 2023