माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी संतोष पुजारी, उपसभापती पदी राहुल गायकवाड निवड झाल्याने जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी पुन्हा बाजी मारली.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती साठी चुरशीने झाले. यामध्ये भाजप राष्ट्रवादी गटाला 9 तर शिवसेना काँगेस गटाला 9 जागा मिळाल्या होत्या.

आज निवडी असल्याने कोण निवडून येणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. भाजप राष्ट्रवादी कडून सभापती साठी हणमंतराव देशमुख व उपसभापती साठी दादासो हुबाले तर शिवसेना काँगेस कडून सभापती पदासाठी संतोष पुजारी उपसभापती पदासाठी राहुल गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
निवडणुकी मध्ये संतोष पुजारी यांना दहा मते तर उपसभापती पदासाठी राहुल गायकवाड यांना प्रत्येकी 10 मते मिळाल्याने त्यांना विजय प्राप्त केला.