Latest Marathi News

BREAKING NEWS

 

पुन्हा एकदा लाल दिव्याची चर्चा! आमदार शहाजीबापू पाटलांना मिळणार का मंत्रीपद …

0 872

सांगोला : सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या. तशी सांगोल्यात लाल दिव्याच्या गाडीचीही चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आलेले व जिल्ह्यात शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले आमदार शहाजी पाटील यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल, अशी अशा आता कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.

 

राज्यातील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सोलापूर जिल्ह्याचे एकमेव आमदार असलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा समावेश होता. या बंडाच्या दौऱ्यामध्येच आमदार शहाजी पाटील यांचे ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओके’ हा डायलॉग मोठा गाजला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात आमदार शहाजी पाटील यांची उपस्थिती व भाषणं लक्षवेधी ठरत आहेत.

सध्या सुप्रिम कोर्टाच्या राजकीय निकालानंतर पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. या विस्तारामध्ये प्रसिद्धीच्या झोतात असलेले आमदार शहाजी पाटील यांना मंत्रिपद दिले जाईल व सांगोल्याला लाल दिव्याची गाडी पुन्हा मिळेल, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

मला मंत्रिपदाबाबत कोणतीही लालसा नाही. सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारकडून सांगोला विधानसभेसाठी निधी व महत्त्वाची कामे होत आहेत. मला गेल्या अनेक वर्षांच्या कामाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. कार्यकर्त्यांना मी नामदार व्हावे असे निश्चितपणे वाटत असेल पण मला सांगोल्याला कामांच्या बाबतीत वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचे आहे. याबाबत मी सतत काम करीत आहे व राहणार. मंत्रिपद मिळाले तरी संधीचं सोने करीन.

Leave A Reply

Your email address will not be published.