Latest Marathi News

BREAKING NEWS

आश्चर्यकारक : पोलिसांनीच लाऊन दिलं विधवा महिलेच थाटामाटात लग्न

0 519

बिहारच्या ब्रह्मपूर येथे पोलिसांनी विधवा महिलेचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिल्याची अनोखी घटना समोर आली आहे. या अनोख्या लग्नाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. ब्रह्मपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रक्षा नगर गावातील विधवा महिला मुस्कान पतीच्या निधनानंतर आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीसह एकटीच जीवन जगत होती.

मुस्कानची ओळख याच दरम्यान ब्रह्मपूर गावातील स्थानिक रहिवासी देव कुमार साह यांचा मुलगा सूरज कुमार साह याच्याशी झाली. गेल्या सहा महिन्यांपासून दोघांमधील प्रेमसंबंध वाढतच गेले आणि दोघेही फोनवर एकमेकांशी बोलू लागले. मात्र घरातील सदस्यांना हे नातं मान्य नसल्याने दोघंही घरातून पळून गेले.

Manganga

जेव्हा मुस्कानचे सूरजसोबतचे प्रेमसंबंध घरच्यांना कळले तेव्हा दोन्ही कुटुंबातील लोकांनी हे नातं मान्य केलं नाही. यानंतर विधवा महिलेसह तिचा प्रियकर सूरज घरातून पळून झारखंडमधील जमशेदपूर येथे गेला. त्याचवेळी कुटुंबीयांनी दोघेही बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली.
दोघांची चौकशी सुरू केली असता हे प्रेम प्रकरण निघाले.

 

दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचवेळी ब्रह्मपूर पोलीस ठाण्याचे अध्यक्ष बैजनाथ चौधरी यांनी दोघांच्याही कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. जिथे पोलिसांनी दोन्ही पक्षांना लग्नासाठी तयार केलं. यानंतर दोघांनी प्रसिद्ध बाबा ब्रह्मेश्वरनाथ मंदिरात लग्न केलं.

या विवाहात स्थानिक पोलीस, लोकप्रतिनिधी आणि मंदिर समितीच्या लोकांनी पाहुणे बनून सर्व विधी पार पाडल्या. तसेच पोलीस स्टेशन अध्यक्ष बैजनाथ चौधरी यांच्या वतीने मंदिरात उपस्थित सर्व लोकांना मिठाई वाटण्यात आली आणि त्यानंतर नववधू मुस्कानला तिच्या नवीन घरी पाठवण्यात आलं. पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!