Latest Marathi News

BREAKING NEWS

 युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल

0 805

 

पुणे: समाजमाध्यमातील ओळखीतून एका युवतीवर बलात्कार केल्या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी संभाजीनगरमधील युवकास अटक केली. फैजल दादामिया पठाण (वय १९, रा. बडेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत एका युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फैजल आणि युवतीची समाजमाध्यमातून ओळख झाली होती.

 

Manganga

फैजलने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर फैजल पुण्यात आला. त्याने युवतीला हडपसर भागातील एका  हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर युवतीवर त्याने संशय घेण्यास सुरुवात केली.

 

युवतीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने युवतीला स्वारगेट भागात भेटण्यास बोलावले. युवतीला मारहाण करून त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. युवतीने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी हडपसर पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!