माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील प्राथमिक शिक्षक असलेले सिराज फरदीन तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ४२ होते.
खरसुंडी येथे सिराज तांबोळी हे राहण्यास होते. तर बाळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ते कार्यरत होते. गेले एक महिना ते आजाराने त्रस्त होते. त्याबाबत त्यांच्यावर उपचार देखील चालू होते. परंतु आज सकाळच्या सुमारास त्यांची खरसुंडी येथील राहत्या घरी प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार असून खरसुंडी येथे दफनविधी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबासह त्यांचा मित्रपरिवारावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.