विटा पालिकेचे मुख्याधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात : दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : विटा पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर हे ठेकेदाराकडून लाच घेतानालाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. दोन लाखांची लाच स्विकारताना त्यांना रंगाहाथ पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील एका ठेकेदाराकडे इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील रोख रक्कम दोन लाख रुपये स्वीकारताना लाच लचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून ही माहिती दिली होती. त्यानुसार या विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांनी आज मंगळवारी (दि. १६) दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. दरम्यान तीन महिन्यापूर्वी १० मार्च रोजी विनायक औंधकर यांची विटा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती.

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना लाच स्विकारताना लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याचे बातमी विटा शहरात समजताच काही जणांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.