Latest Marathi News

BREAKING NEWS

वांग्याचे दर घसरत असल्याने शेतकऱ्याने फुकट वांगी घेऊन जा ; असे आवाहन सोशल मीडियावरून आवाहन

0 431

चंद्रपूर : लागवड खर्च आणि उत्पन्नात ताळमेळच जुळत नसताना सध्या बाजारात दरदिवशी वांग्यांचे दर सपाटून कोसळत आहेत. वांग्याचा दर प्रतिकिलो तीन रुपये झाला . त्यामुळे हताश झालेल्या मूल तालुक्यातील टेकाडी येथील मंगेश पोटवार या युवा शेतकऱ्याने ‘टेकाडीच्या शेतात या अन् वांगी मोफत न्या !’ असा संदेश चक्क सोशल मिडियावरून व्हायरल केला. भाजीपाला शेतकऱ्यांची व्यथा दर्शविणारा हा संदेश सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

 

पूर्व विदर्भात सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढली; मात्र दर घसरल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. मूल तालुक्यात मूल एकमेव ठोक बाजारपेठ आहे. या बाजारपेठात सध्या वांगी सध्या ३ रूपये प्रतिकिलो असा दर आहे. चवळी शेंगा १० रुपये किलो, भेंडी १५ रुपये किलो, चवळी भाजी सहा जुळ्या १० रुपये असा दर सुरू आहे. भाजीपाल्याच्या दरात दररोज घसरण होत आहे.

Manganga

 

मूल तालुक्यात वांगी, शेंगा, भेंडी व चवळी भाजी आदी पिके घेतली जातात. टोमॅटो लागवड अल्प प्रमाणात होते. त्यामुळे मूल बाजारपेठेत टोमॅटोची बाहेरून आवक सुरू आहे. त्याचा दरही बरा आहे; मात्र वांगी व अन्य भाजीपाल्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने तोट्याची शेती किती दिवस करायची, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. या हतबलतेतूनच टेकाडी येथील मंगेश पोटवार या युवा शेतकऱ्याने शेतात येऊन वांगी मोफत घेऊन जा, असे आवाहन सोशल मिडियावरून केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!