जोडप्याने भररस्त्यात बाईक सीटवर बसून केली अंघोळ ! प्रवाश्यांनी लज्जास्पद शब्दात केली टीका;व्हिडीओ पहा ….
मागील काही दिवसात सोशल मीडियावर अत्यंत विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दिल्ली मेट्रोमधील अश्लील व्हिडिओच्या पाठोपाठ आता मुंबईत सुद्धा काही बेभान मंडळींनी उच्छाद मांडला आहे.
ज्यामध्ये एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंडच्या बाईकवर मागच्या सीटवर बसून चक्क आंघोळ करताना दिसत आहे. यावेळी ती आपल्या बॉयफ्रेंडच्या अंगावरही पाणी ओतते. इतका भीषण प्रकार पाहून लोकांनाही त्यांच्यावर अगदीच जहरी शब्दात टीका केली आहे.

सध्या सगळीकडेच उन्हाचा पारा वाढल्याने अंगाची लाहीलाही होते. यामुळे उन्हापासून वाचण्यासाठी अगदी काही सेकंद गारवा मिळवा म्हणूनही अनेकजण नानाविधी प्रयोग करत आहेत पण त्यातील हा भररस्त्यात आंघोळीचा प्रकार अगदीच मर्यादा सोडून असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.
यातील बहुतांश लोकं ही केवळ व्हायरल होण्याच्या नादाने असे विचित्र प्रकार करतात पण त्यांच्या या कृतीने रस्त्यावर ये- जा करणाऱ्यांची मान शरमेने खाली जाते यांची त्यांना जाणीवही होत नाही अशा प्रकारच्या टीका या व्हिडिओवर होत आहेत.
@DGPMaharashtra @ThaneCityPolice
This is ulhasnagar, Is such nonsense allowed in name of entertainment? This happened on busy Ulhasnagar Sec-17 main signal.Request to take strict action lncluding deletion of social media contents to avoid others doing more nonsense in public. pic.twitter.com/BcleC95cxa— WeDeserveBetterGovt.🇮🇳 (@ItsAamAadmi) May 15, 2023