आपल्यापैकी अनेकांना बाईकचे वेड असेल. मागच्या सीटवर बसून बाईकवरुन फिरायला आवडतं अशीही अनेक मंडळी असतील. आलिशान कारपेक्षाही छान थंडगार वारा व निसर्ग अनुभवत बाईकने फिरायला जाणं याची मजाच काही और असते. पण अलीकडे बाईकचे भावही खूप वधारले आहेत.
एवढंच नव्हे तर बाईक एकदा घेतल्यावर पुढे पेट्रोलचे दर ऐकून तर चक्रावूनच जायला होतं. पण आता यावर एका हुशार पठ्ठ्याने जबरदस्त जुगाड शोधल्याचे समजतेय. आजवर तुम्ही पेट्रोलला पर्याय म्हणून डिझेल, इलेक्ट्रिक, काही वेळा घरगुती मोटारवर बनलेली स्कुटर/ बाईक पाहिली असेल पण सध्या व्हायरल होणाऱ्या बाईकची एका तरुणाने चक्क बीअरचा वापर केला आहे.

अमेरिकेतील मिशिगन येथील रहिवाशी माइकलसन याला बाईकची खूप आवड आहे. तो नेहमीच वेगवेगळ्या मॉडेलच्या बाईकची खरेदी करत असतो. यावेळी त्याने स्वतःच एका बाईकचा जुगाड केला आहे जी पेट्रोलवर नाही तर चक्क बीअरवर धावते. विशेष म्हणजे माइकलसन हा स्वतः बीअर पिट नाही पण त्याने त्यातून हा जो काही भन्नाट उपयोग शोधून काढलाय तो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.