Latest Marathi News

BREAKING NEWS

सावधान! भारतीय हवामान खात्याकडून राज्यात पुन्हा तापमानवाढीचा इशारा

0 372

नागपूर : राज्यात आणि विशेषत: विदर्भात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेला असताना १७ मे पासून पुन्हा तापमानवाढीचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत.

अवकाळी पावसानंतर राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील अकोला शहरात घेण्यात आली.

Manganga

 

तर उर्वरित शहरांमध्येदेखील हा पारा ४२ ते ४४च्या दरम्यान होता. सोमवारी तापमानात एक ते दोन अंशाची घट दिसून आली. त्यामुळे नागरिक सुटकेचा सुस्कारा सोडत असतानाच हवामान खात्याने हा तापमानवाढीचा इशारा दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!