Latest Marathi News

BREAKING NEWS

गौतमी पाटीलला ‘सबसे कातील गौतमी पाटील’ असं का म्हटलं जातं! गौतमीनेच दिलं उत्तर; घ्या जाणून…

0 2,485

गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे. “सबसे कातील गौतमी पाटील असं माझ्याविषयी म्हटलं जातं हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. मला या गोष्टीचं खूप समाधान वाटते. छान वाटते. माझ्या कार्यक्रमांना आता महिला वर्गही येऊ लागला आहे. याचंही बरं वाटते. प्रेक्षकांनी मला प्रेम दिले.

मला कुठल्याही राजकारणात यायचं नाही. मी कलाकार आहे. मी माझी कला सादर करत राहणार आहे असं गौतमीने म्हटलं आहे. तसंच गौतमीने प्रेक्षकांनाही महत्त्वाचं आवाहन केले. “माझं सगळ्या प्रेक्षकांना एवढंच सांगणं आहे की, तुम्ही एवढ्या लांबून माझ्या कार्यक्रमाला येत असतात. तुमचं माझ्यावर प्रेम आहे. माझं एकच म्हणणं आहे. प्रत्येक कार्यक्रमाला वाद होत नाहीत.

Manganga

 

गेल्या काही दिवसांपासून मी पाहते आहे की माझ्यावरुन वाद होतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या प्रत्येक कार्यक्रमावरून वाद होत नाही. काहीतरी छोटं-मोठं घडतं. ते वाढवून वाढवून सांगितलं जाते. तसंच लग्न करण्याचा इतक्यात तरी काही विचार नाही असंही गौतमी पाटीलने स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!