सध्या आपल्या देशामध्ये लग्नांचा सीझन सुरु आहे. दररोज सोशल मीडियावर लग्नांच्या किंवा लग्नाशी संबंधित कार्यक्रमांमधील फोटो, व्हिडीओ पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांमध्ये लग्नपरंपरेमध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळते.
प्री-वेडिंग ही संकल्पना देशामध्ये पूर्णपणे रुजली आहे. त्याशिवाय लग्नामध्ये डान्सला खास महत्त्व आल्याचेही दिसते. नवरा-नवरी करवल्या तसेच दोन्ही कुटुंबातील सदस्य या आनंदाच्या क्षणी संगीताच्या तालावर थिरकताना दिसतात. लग्नकार्यातले व्हिडीओ लोक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओची सध्या लोकांमध्ये चर्चा होत आहे.

लग्नाची वरात येताना वरपक्षातील मंडळी नाचताना आपण पाहत आलो आहोत. काही वेळेस त्यांच्यासह खुद्द नवरदेव सुद्धा नाचत असतो.
सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे, ज्यात वऱ्हाडींच्या ऐवजी नवराच बेभान होऊन नाचत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला नवरा-नवरी दोघेही मंडपाच्या स्टेजवर उभे असलेले दिसतात. लगेच एक भोजपुरी गाणं सुरु होते.
आणि त्यावर नवरदेव थिरकायला लागतो. जमलेल्या नातेवाईक, आप्तेष्टांसमोर डान्स करताना तो नवरीकडे पाहून खास लूक देत असतो. नवऱ्याला नाचताना पाहून नवरीही हसते. पुढे नवरदेव नवरीचा हात हातांमध्ये घेत तिलाही नाचायला लावतात. स्टेजवर मागच्या बाजूल उभी असलेली करवली त्या दोघांकडे पाहून हसत असते. व्हिडीओला त्यांनी ‘नवऱ्याला झालेला आनंद पाहण्यासारखा आहे’ असे कॅप्शन दिले आहे.
दूल्हे की खुशी तो एकदम देखने लायक हैं 😂 pic.twitter.com/0j4FYvoI98
— Hasna Zaroori Hai 🇮🇳 (@HasnaZarooriHai) May 12, 2023