सोलापूर : नृत्यांगना गौतमी पाटील आणि वाद किंवा गोंधळ हे आता नवीन राहिलं नाही. गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटील माध्यमांत आणि सोशल मीडियात चांगलीच चर्चेत आहे. गौतमीचं जिथं जिथं शो असतो. तिथं काहीतरी नवा वाद किंवा चर्चेतली घटना घडते.
दोन दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी इथं गौतमीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होता. या कार्यक्रमाच्या आयोजकांची फसवणूक केल्याप्रकरणी गौतमी पाटीलविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच यासंदर्भात बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बार्शी महोत्सवात कार्यक्रम करताना परवानगी न घेता गर्दी जमवून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आयोजकावर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बार्शी येथे येथे शुक्रवार, दि. १२ मे रोजी झाला. विनापरवाना कार्यक्रम घेतल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल वाडकर यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार आयोजक प्रजाशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र भगवान गायकवाड (रा.बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमादिवशीही पोलिसांनी आयोजकाला गौतमीचा शो बंद करायला लावला होता. त्यामुळे, कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांची नाराजी झाली, केवळ एकाच गाण्यावर गौतमीने डान्स केला होता. आता, गौतमीकडूनच आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत आयोजकानेच फिर्याद दिली आहे.
