माणदेश एक्सप्रेस न्युज : पंढरपूर : पंढरपुर तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि दत्तकृपा पेट्रोल पंपाचे मालक बाळासाहेब राजाराम माळी यांनी सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सोशल मीडियावर आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट लिहून व्हायरल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांचा दत्तकृपा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून पंढरपूर येथील तानाजी कोळी आणि बाळासाहेब माळी यांचे पुतणे प्रदीप माळी हे सर्व कामकाज पाहत होते. या दोघांनी आर्थिक व्यवहारांमध्ये मोठा घोटाळा करत एक कोटी एकवीस लाखांचा अपहार केला असल्याची सुसाईड नोट बाळासाहेब माळी यांनी सोमवार रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास व्हाट्सअप ग्रुप वर टाकली.

कोळी यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीला आणि दमबाजीला कंटाळून मी कुटुंबासह आत्महत्या करीत आहे, मी खूप लांब आलो आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, असा मेसेज असा संदेश व्हाट्सअप ग्रुप वर टाकून ते आपल्या परिवारासह बेपत्ता झाले आहेत.