माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष पदी आटपाडी आटपाडी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांचे नाव चर्चेत आले असून याबबत पक्ष निरीक्षक यांच्या उपस्थित काल सांगली येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीत भाजपचे दोन्ही जिल्हाध्यक्ष बदलले जाणार असल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी सांगलीत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. जिल्हाध्यक्षपदासाठी सध्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक रविवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पार पडली. पक्षाचे निरीक्षक सुरेश हाळवणकर यांनी ही बैठक बोलावली होती. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, सम्राट महाडिक, संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पवार, नीता केळकर, मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.
पक्षीय कार्याचा आढावा घेताना ‘पदाधिकारी बदलाबाबतची माहिती हाळवणकर यांनी दिली. इच्छुकांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम पक्षाने हाती घेतले आहे. त्यानुसार पदाधिकारी बदलाबाबत नेत्यांच्या मतांची नोंद घेण्यात आली. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी तिघांची नावे चर्चेत आहेत. येत्या काही दिवसांत नावांचे प्रस्तावा तयार करून प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविली जाणार आहेत. त्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.