Latest Marathi News

BREAKING NEWS

पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू; तर पाच मुलींना वाचवण्यात यश  

0 426

 

पुणे:  खडकवासला धरणात गोऱ्हे खुर्द येथे आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या नऊ मुली बुडाल्या होत्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Manganga

असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. सात मुलींना वाचवण्यात आले असून कुमुद संजय खुर्द वय १३, शितल भगवान टिटोरे वय १५ या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कुमुद संजय खुर्द वय १०,पायल संतोष सावळे वय १६, शितल अशोक धामणे वय १७, पल्लवी संजय लहाने वय १०, राशी सुरेश मांडवे वय ९, राखी संजय लहाने वय १६ आणि ३२ वर्षीय मीना संजय लहाने ही महिला तसेच कुमुद संजय खुर्द वय १३, शितल भगवान टिटोरे वय १५ असे मयत एकूण ९ जणी काल एका नातेवाईकांच्या घरी कार्यक्रमासाठी आल्या होत्या.

त्यानंतर आज सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरण क्षेत्रातील गोऱ्हे बुद्रुक येथील कलमाडी फार्म हाऊसच्या मागील बाजूस कपडे धुण्याकरता आणि आंघोळी करता आल्या होत्या.

 

त्यावेळी सात मुली पाण्यात उतरल्या.तर एक महिला कडेला आंघोळ करीत होती.त्यावेळी पाण्यात उतरलेल्या मुलींना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्या बुडू लागल्याचे दिसताच बाहेर थांबलेल्या दोन मुलींनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेथून काही अंतरावर स्मशानभूमी होती.

 

त्यावेळी तिथे सावडण्याचा विधी सुरू होता. त्या मुलींचा आरडाओरड पाहून तेथील नागरिक पाण्यात बुडत असलेल्या मुलींच्या दिशेने धावत आले. त्यानंतर त्यातील काहीनी पाण्यात उडी मारून ५ मुलींना सुखरूप बाहेर काढले. तर अन्य दोन मुलींचा मृतदेह तब्बल तासाभराने बाहेर काढला. तर या घटनेमध्ये कुमुद संजय खुर्द वय १३, शितल भगवान टिटोरे वय १५ या दोघींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!