Latest Marathi News

BREAKING NEWS

विचित्रकारक! नात्याला काळीमा फासणारी एक घटना! कर्ज फेडण्यासाठी वडिलांनी 4 वर्षीय लेकीला ठेवलं गहाण…

0 432

दारू पिण्यासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी एका पित्याने आपल्या निष्पाप मुलीला गहाण ठेवले. तसेच त्याने कर्ज फेडल्यावर मुलीला सोडा, असं देखील सांगितलं. जयपूरमध्ये ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या एका भागात एक व्यक्ती त्याची पत्नी, 4 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षाच्या मुलासोबत राहतो. तो रद्दीचे काम करतो आणि त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे.

नशा करण्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून काही पैसे घेतले होते, जे तो परत करू शकला नाही. दुसरीकडे पैसे देणारी व्यक्ती याबाबत वारंवार तक्रार करायची. याच दरम्यान, पैसे देण्यासाठी त्याने हे घृणास्पद कृत्य केले. हे उघडकीस आल्यानंतर लोकांना मोठा धक्का बसला आहे.

Manganga

मुलगी भीक मागून रोज 100 रुपये आणायची आणि त्याला द्यायची. आतापर्यंत तिने 4500 रुपये दिले आहेत. दरम्यान, त्याच्या 6 वर्षाच्या भावाने तिला तेथून बाहेर काढले आणि कोटा येथे नेले. दोघेही रेल्वे कॉलनी परिसरात फिरत असल्याचे पाहून नगरसेवकाने पोलिसांना माहिती दिली.
मुलाने सांगितले की, त्याची आई अपंग आहे.

 

आणि वडिलांना दारूचे व्यसन आहेत. उसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी त्यांनी बहिणीला गहाण ठेवलं होते. दुसरीकडे अरुण भार्गव यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, एसपी ग्रामीण आणि एसपी शहर आमच्याकडे आले होते. याप्रकरणी पोलीस आरोपी बाप आणि भीक मागायला लावणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!