दारूच्या व्यसनापोटी माणूस पिसाळलेल्या प्राण्यांसारखा विचित्र वागू लागल्याचे आपणही पाहिले असेल. पण हा दारूचा नाद प्राण्यांनाही सोडत नाही बरं! अलीकडेच सोशल मीडियावर एका दारुड्या बकरीचा व्हिडीओ शेअर झाला होता.
अवघ्या काहीच तासात हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बकरीला दारू पिण्यापासून रोखताच तिने भयंकर हिंसक रूप धारण केल्याचं पाहायला मिळतं आहे.

यामध्ये दोन मित्र घराबाहेर एकत्र बसून बिअर पार्टी करत होते. या दोघांच्या समोर अनेक बिअरचे कॅन ठेवण्यात आले आहेत. दोघे एन्जॉय करत आहेत. पण त्यांच्या आनंदात एक बकरी आली. दारू मिळत नसल्याचं पाहून तिला भलताच राग आला. यानंतर तिने सर्व शक्तीनिशी त्या व्यक्तीवर हल्ला केला.